ऑनलाईन टीम / अबू धाबी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जगातील सर्वात उंच असणाऱ्या बुर्ज खलिफा या दुबईतील इमारतीवर गांधीजींच्या छायाचित्रांचा स्लाईड शो आणि विद्युत रोषणाई करून महात्मा गांधींना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने आपल्या सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून म्हटले आहे की, संध्याकाळी 7 वाजता ‘गांधीजींच्या संदेशाची प्रासंगिकता’ या विषयावर एक खास कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. त्यानंतर 8.15 वाजता बुर्ज खलिफावर एलईडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्लाईड शो होईल.
2019 मध्येही गांधी आणि भारतीय ध्वजाची छायाचित्रे बुर्ज खलिफावर प्रदर्शित करण्यात आली होती.