रिलायन्स समभागांची 6 टक्क्मयांची घसरण : निफ्टीही घसरला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशीच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 190.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 31,371.12 वर बंद झाला. यासह शेअर बाजारातील अन्य बाजारामध्येही दबावाचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले. याचा परिणाम म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मंगळवारी मोठय़ा प्रमाणात कोसळले आहेत.
जागतिक गुंतवणूकदारांचा कल लक्षात घेतल्यास कोरोनाच्या वाढत्या संसर्गात पुन्हा वेगाने वाढ होण्याची भीती जगभरातील अभ्यासक सध्या व्यक्त करत आहेत. याचे दूरगामी परिणाम म्हणून देशातील शेअर बाजाराकडे पाहण्याचा दृष्टीकोनही गुंतवणकदारांचा नकारात्मक होत असल्याने कंपन्यांचे समभाग घसरत आहेत. ही बाब गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी प्रमुख तीन समभागांच्या व्यवहारात मंगळवारी सेन्सेक्सची कामगिरी 716 अंकांच्या खाली गेली होती. परंतु काहीशा वेळाने यात सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुन्हा स्थिरतेकडे बाजाराची वाटचाल दिसली. दिवसअखेर सेन्सेक्स 190.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 31,371.12 वर बंद झाला तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 42.65 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,196.55 वर बंद झाला.
दिवसभरात सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक म्हणजे 6 टक्क्मयांनी घसरले आहेत. सोबत एशियन पेन्ट्स, कोटक बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि ओएनजीसी यांचे समभाग घसरले आहेत तर दुसरीकडे मात्र एनटीपीसी, भारती एअरटेल, आयटीसी आणि इंडसइंड बँक व पॉवरग्रिड यांचे समभाग तेजीत राहिले होते. सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक होत असून आगामी काळातील शेअर बाजारांची वाटचाल ही दबावात राहणार असल्याचे संकेत शेअर बाजार अभ्यासकांनी दिले आहेत.