प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ ) कडून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दरफरकापोटी 71 कोटी तर प्राथमिक दूध संस्थांना लाभांशा पोटी 5 कोटी 3 लाख 25 हजार असे 76 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती चेअरमन रविंद्र आपटे यांनी दिली.
मागील वर्षाच्या महापूरामुळे शेतकरी अडचणीत आलेला होता. तसेच सगळीकडे पसरत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे, साखर कारखाने अडचणीत असताना गोकुळ दूध संघाने खर्चात काटकसर करुन वर्षभर राज्यातील इतर संघांच्या तुलनेत जास्त दर दिलेला आहे. कोरोना महामारीच्या या काळामध्ये आमदा पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने शेतकऱ्यांचे हित जोपासून तसेच कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना सुद्धा संकलन बंद न ठेवता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज 4.5 कोटी रुपये त्यांच्या घरात पोहचवण्याचे काम करत आहे. असे आपटे यांनी सांगितले. संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दर फरक दिला जातो. त्याप्रमाणे यावर्षीही संघ म्हैस व गाय दुधाला व संस्थांना लाभांश देणार आहे. दुध
असा मिळणार फरक
म्हैस दूध 45,83,44,000
गाय दूध 17,46,56,000
6 टक्के व्याज 1,89,90,000
डिबेंचर्स 7.75 टक्के व्याज 5,56,45,000
संस्था लाभांशा 5,03,25,000
दूध संस्था लाभांशा 5,03,25,000
उच्चांकी फरकाची परंपरा कायम
गोकुळ ही जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पदकांच्या कष्टावर उभी आहे. त्यामुळे त्यांना संघाकडून नेहमी काहीतरी देण्याचा प्रयत्न सातत्याने असतो. यंदाचा दर फरक, लाभांश उच्चांकी आहे. यापुढेही अशीच परंपरा सुरु राहिल – रविंद्र आपटे, चेअरमन गोकुळ