प्रतिनिधी / देवगड:
देवगड तालुक्यातील चिरेखाण, रस्ते कामगार व इतरत्र काम करणाऱया 426 परप्रांतीय मजूरांना 20 एस. टी. बसमधून गावी जाण्यासाठी ओरोस रेल्वे स्थानकावर नेऊन सोडण्यात आले. यांना मजूर ओरोसहून मथुरा एक्सप्रेसने विजापूरला पाठविण्यात येणार आहे.
देवगड एस. टी. डेपोतून या मजुरांसाठी शनिवारी 20 बसेस सोडण्यात आल्या. यावेळी नायब तहसीलदार प्रिया परब, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानक प्रमुख गोरे व एस. टी. कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी 457 मजूरांना एस. टी. बसने पाठविण्यात आले होते.