दिवसभरात 50 हजार 848 नवे कोरोनारुग्ण- 1,358 मृत्यूंची नोंद, 68 हजार 817 डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणू संसर्गापासून आतापर्यंत देशात 3 कोटींहून अधिक बाधितांची नेंद झाली आहे. एकूण बाधितांपैकी 3 लाख 90 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 89 लाख 94 हजार 855 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्या देशात 6 लाख 43 हजार 194 इतके सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्यामुळे हा आकडा सातत्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना सक्रिय रुग्णसंख्येच्या यादीत भारत जगभरात तिसऱया स्थानी असून एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱया स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात देशाच्या विविध भागात 50 हजार 848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,358 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच दिवसभरात 68 हजार 817 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी सोमवारी 42 हजार 640 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात सलग 41 व्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट जवळपास 96 टक्के आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन 3 टक्क्मयांहून कमी झाली आहे.
22 जूनपर्यंत देशभरात 29 कोटी 46 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 54 लाख 24 हजार लसीचे डोस देण्यात आले. तसेच आतापर्यंत 39 कोटी 59 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात 19 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्मयांहून अधिक आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट ‘चिंताजनक’ घोषित
देशात दुसऱया लाटेवर नियंत्रण मिळण्याची शक्मयता निर्माण झाली असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर केले आहे. तसेच या तीनही राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे. सध्या देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 40 हून अधिक रुग्ण सापडल्याचा दावा करत त्यांच्यापासून तिसऱया लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे.