- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्क्यांवर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात भारतात 54 हजार 069 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 00 लाख 82 हजार 778 वर पोहचली आहे. बुधवारी 1,321 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत 3,91,981 जणांनी आपला जीव गमावला आहे.
गुरुवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 68 हजार 885 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 कोटी 90 लाख 63 हजार 740 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61% इतके आहे. सध्या देशात 6 लाख 27 हजार 057 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर संसर्ग दर 3.04 टक्के इतका आहे.
- 30 कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
देशात मागील तीन दिवसांपासून रेकॉर्डब्रेक लसीकरण झाले आहे. पहिल्या दिवशी 86 लाख पेक्षा अधिक जणांना लस देण्यात आली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 54 लाख होता. तर बुधवारी 64.89 लाख जणांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत देशातील 30 कोटी 16 लाख 26 हजार 028 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 39 कोटी 78 लाख 32 हजार 667 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 59 हजार 469 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 23 जून 2021) एका दिवसात करण्यात आल्या.