ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी 9851 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 26 हजार 770 वर पोहचली असून, मृतांची संख्या 6348 एवढी आहे.
सध्या देशात 1 लाख 10 हजार 960 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 09 हजार 462 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 77 हजार 793 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 27 हजार 256, गुजरातमध्ये 18 हजार 584, मध्यप्रदेश 8762, आंध्र प्रदेश 4223, बिहार 4493, राजस्थान 9862 तर पश्चिम बंगालमध्ये 6876 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.