ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात आतापर्यंत 1 कोटी 07 लाख 33 हजार 131 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 कोटी 04 लाख 09 हजार 160 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आजूनही 1 लाख 69 हजार 824 रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात मागील 24 तासात 13 हजार 083 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 14 हजार 808 रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल 137 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 54 हजार 147 एवढी आहे.
देशात आतापर्यंत 19 कोटी 58 लाख 37 हजार 408 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 56 हजार 329 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.29) करण्यात आल्या.