ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सोमवारी अजून एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उत्तराखंड राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 93 वर पोहचली आहे. तर 93 रुग्णांपैकी 52 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसंत विहार मधील महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला काही दिवसांपूर्वी आपल्या पतीसोबत महाराष्ट्रातून आली होती. त्यानंतर 15 मे रोजी त्यांच्या मुलाने वसंत विहार ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर या पती-पत्नींची तपासणी करण्यात आली यामध्ये पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. हे दांपत्य मूळचे उत्तरकाशी चे रहिवासी आहेत.
या महिलेसोबत अन्य आठ जण उत्तरकाशी येथे आले होते. ते 14 मे पासून पंचायतमध्ये क्वारंनटाइन होते आता त्यांना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या सर्वांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचे संपल्स एम्स ऋषिकेशमध्ये पाठविण्यात आले आहेत. अजून तरी कोणामध्ये कोरोनाची लक्षणे नाही आहेत.