प्रतिनिधी / बेळगाव
दैवज्ञ बाह्मण समाज सांस्कृतिक भवन समिती संचालित दैवज्ञ भगिनी मंडळाचा पहिला वर्धापनदिन शांताई वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हा कार्यक्रम अगळय़ा वेगळय़ा पद्धतीने वृद्धाश्रमासारख्या पवित्र ठिकाणी साजरा करण्यात आला.
प्रारंभी पूजा कित्तूर, सुनंदा तेरगावकर, श्रुती सांबरेकर, आरती रायकर, मोहिनी सांबरेकर, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक चौगुले आदींच्या हस्ते दीपप्रज्ललन करून कार्यक्राची सुरुवात करण्यात आली. पूजा कित्तूर यांनी गणेश आराधना केली. श्रुतिका बांदिवडेकर यांनी वृद्धांबद्दल समाजाची कर्तव्ये याबद्दल मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक चौगुले यांनी उपस्थित भगिनी मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करून मनोगत क्यक्त केले.
शांताई वृद्धाश्रमाच्या चांगल्या कार्याची दखल घेत व्यवस्थापक चौगुले यांचा भगिनी मंडळातर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मंडळाचा पहिला वर्धापनदिन वृद्धाश्रमातील वृद्ध क्यक्तांच्या समवेत साजरा केला. आश्रमातील वृद्ध महिलांचा खाद्यपदार्थ, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले. याप्रसंगी दैवज्ञ भगिनी मंडळाच्या सदस्या, आश्रमातील वृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.