सिगन चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्लॅडिएटर्स संघाने ऍडव्होकेट संघाचा 4 गडय़ांनी तर दैवज्ञ स्पोर्टस् संघाने केएसजीए संघाचा 24 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. आदित्य एस. (ग्लॅडिएटर्स), शतकवीर शुभम भिशनकोप्प (दैवज्ञ) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सिगन चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बसवराज भागोजी, डॉ. के.डी. देशपांडे, दीपक गुडगनट्टी, चंदन कुंदरनाड, हुसेन गोकाक, सुधीर सक्री, सुनील सक्री, बसवराज सुब्रम्हणीयम आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या सामन्यात ऍडव्होकेट संघाने 9.3 षटकांत सर्व बाद 143 धावा केल्या. त्यात सुनील सक्रीने 65, हेमराज बेंचण्णावरने 12 धावा केल्या. ग्लॅडिएटर्सतर्फे आदित्य साखरदेवडेने 18 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर ग्लॅडिएटर्स संघाने 19 षटकांत 6 बाद 144 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात फरानने 26, निश्चील तेरणीने 37, आदित्य साखरदेवडेने 20 धावा केल्या. ऍडव्होकेट संघातर्फे हेमराज बेंचण्णावरने 23 धावांत 3, सुनील सक्रीने 27 धावांत 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात दैवज्ञ स्पोर्टस् क्लब संघाने 20 षटकांत 4 बाद 169 धावा केल्या. त्यात शुभम भिशनकोप्पने 3 षटकार व 14 चौकारांसह 103 धावा करून स्पर्धेतील पहिले शतक झळकविले. पुनीतने 28 धावा केल्या. केएलजीएतर्फे कलंदरने 39 धावांत 2, अब्दुल वाईने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएसजीए संघाने 20 षटकांत 8 बाद 144 धावाच केल्या. त्यात आनंदने 28, रानसीकने 27, अजितने 23 धावा केल्या. दैवज्ञतर्फे अशोकने 19 धावांत 2 गडी बाद केले.