प्रतिनिधी/ पणजी
समस्त गोमंतकीयांची मने जिंकणाऱया दैनिक तरुण भारतच्या गोवा आवृत्तीचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी थाटात साजरा होणार आहे.
पणजीतील आझाद मैदानावर यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त तरुण भारतचे असंख्य वाचक, हितचिंतक, अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी, राज्यातील युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, साहित्यिक, क्रीडा क्षेत्रातील नामवंत मंडळी इत्यादी मोठय़ा प्रमाणात या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
आझाद मैदान पणजी येथे उभारण्यात येत असलेल्या शामियान्यात हा सोहळा होईल. सायं. 5 ते रात्री 8 पर्यंत यानिमित्त खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन दैनिक तरुण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केले आहे.