मनोरुग्ण महिलेवरही अतीप्रसंग
प्रतिनिधी /पणजी
राज्यात गेल्या दोन दिवसांत तीन महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका 46 वर्षीय मनोरुग्ण महिलेवरही अतीप्रसंक करण्यात आला आहे. संबंधीत पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंद करण्यात आल्या असून संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पैकी काही संशयितांना अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उत्तर गोव्यात एका 65 वर्षीय इसमाने एका 46 वर्षीय महिलेवर अतीप्रसंग केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने घडलेली घटना आपल्या बहिणीला सांगितल्यानंतर तिने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयिताच्या विरोधात भादंसं 354 तसचे 376 कलमाखाली तसेच मानसिक आजारी हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने पीडित महिलेच्या आजारपणाचा फायदा घेऊन अगोदर तिचा विनयभंग केला व नंतर तिच्यावर अतीप्रसंग केला आहे.
दरम्यान याच दोन दिवसात एका महाराष्ट्रातील महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याच्यार केल्याचीही घटना घडली आहे. या प्रकरणात एका 30 वर्षीय युवका विरोधात उत्तर गोवा पोलीसांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी 29 वर्षीय पीडित महिलेने संशयिताच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. संशयिताने पीडित महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. नंतर तिला जबरदस्तीने गोळ्या देऊन खाजगी इस्पितळात नेले व गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे पीडित महिलेने संशयित युवका विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भादंसं 376, 313 व 201 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयिन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी योगेश मांद्रेकर (32 म्हापसा) या संशय़िताला पोलिसांनी अटक केली आहे. संशय़िताच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असतो दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याबाबत विदेशी महिलेने तक्रार दाखल केली होती. संशयिताने 8 सप्टेंबर 2021 ते 15 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पर्वरी पोलिसांनी संशय़िताच्या विरोधात भदंसं 376 तसेच 8(2) बाल हक्क कायदा व 4 व 5 पोक्सो कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. पर्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत.