वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱया उत्पादनांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी जॉन्सन ऍण्ड जॉन्सन यांनी अमेरिका आणि कॅनडामधील बेबी पावडरच्या विक्रीवर बंदी घातली आहे. कारण जॉन्सनच्या विरोधात या देशांनी 16,000 कोटीपेक्षा अधिकचे दावे दाखल केले आहेत.
ग्राहकांना आमच्या उत्पादनांची सवय झाली असल्याने सदर ग्राहकांच्या मनात चुकीची माहिती पसरवून कंपनीच्या उत्पादनांवर मोठय़ा प्रमाणात नकारात्मक परिणाम झाला आहे. उत्पादनांची मागणी घटत आहे. यामुळे निर्मितीमधील वेग कमी करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
एका बाजूला उत्पादनात दोष दाखवत या देशांनी 16 हजार कोटीचे दावे केले आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये पुर्नपडताळणीसाठी 33 हजार पावडर डब्बे परत मागविले होते तर दुसरीकडे भारतामध्येही जॉन्सनच्या उत्पादनांवर वाद निर्माण झाला होता. परंतु याला सर्वाधिक पसंतीही भारतामध्येच असल्याचे म्हटले आहे.