वार्ताहर/ धामणे
धामणे विभाग शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने शनिवारी नवरात्र उत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित दुर्गामाता दौडची उत्साही वातावरणात शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्याच धारकऱयांच्या उपस्थितीत येथील कलमेश्वर मंदिरात पूजन करण्यात आली. आरती झाल्यानंतर प्रेरणा मंत्राने दुर्गामाता दौडची सुरुवात झाली.
प्रतिवर्षी शेकडो युवक, युवती येथील दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत असते. परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकारपणे पालन करत 15 ते 20 धारकऱयांच्या सहभागाने दौडला सुरुवात झाली.
याप्रसंगी महादेवच्या पिंडीचे व शस्त्रांचे पूजन शिवप्रतिष्ठान धामणे विभाग प्रमुख महेश पाटील, मल्लाप्पा जायणाचे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर हरहर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, दुर्गामाता की जय या जयघोषात ही दुर्गामाता दौड गावातील कलमेश्वरनगर, नवी गल्ली, पाटील गल्ली, कलमेश्वर गल्ली, शहापूर गल्ली, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, बसवाण गल्ली फिरून बसवाण्णा मंदिर येथे सांगता झाली. गावात दुर्गामाता दौडचे ठिकठिकाणी सुहासीनीनी आरती ओवाळून भगव्या ध्वजाचे व शस्त्राचे पूजन केले. बसवाण्णा मंदिरा आवारात ध्येय मंत्र्घ् झाल्यानंतर शिवशक्ती युवक मंडळाचे अध्यक्ष बाळू केरवाडकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आल्यानंतर दौडची सांगता झाली. या दौडमध्ये नागराज मादाकाचे, अमोल जायाणाचे, विशाल रेमाणाचे, सुमीत जायाणाचे, चांगाप्पा पाटील, कृष्णा मादाकाचे, ज्ञानेश्वर धुळजी, प्रकाश आकणोजी, अक्षय जायाणाचे आदी उपस्थित होते.