पेडणे / प्रतिनिधी
धारगळ येथे वाहतूक खात्याच्या चेक पोष्ट असलेल्या एसी कार्यालयाला सोमवारी सकाळी शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत आरटीओ कार्यालयाचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पेडणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवून 50 ते 60 हजार रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश मिळविले. सकाळी कार्यालयातून धुर येत असल्याचे वाहतूक अधिकारी गावडे यांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी अग्निशामक दलाला दूरध्वनी वरून कळवले. यावेळी हवालदार फटु नाईक, चालक प्रशांत सावळ देसाई, जवान विशाल पाटील, जवान मयुर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझविली.