ऑनलाईन टीम / नागपूर :
नागपूरमध्ये कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयानक होत चालली आहे. अनेक प्रयत्न करूनही सरकार आणि प्रशासनाने अजून यावर नियंत्रण मिळवले नाही आहे. सरकारकडून एकीकडे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली. मात्र, आता लस पुरवठा नसल्याने अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. एकट्या नागपूरमध्येच आज दिवसभरात 6 हजरपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने परिस्थिती अधिक गंभीर झालेली दिसत आहे.
मागील 24 तासात 6,489 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 66 हजार 224 वर पोहोचली आहे.
यासोबतच आज दिवसभरात 2,175 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 लाख 11 हजार 236 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत नागपूरमध्ये 49,347 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 5,641 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.
- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?
दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना विषाणू एक अक्षरशः थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. पण दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.