- गेल्या 24 तासात 75,760 नवे रुग्ण; 1023 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतातही मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. देशातील रुग्ण संख्या रोज नवा उच्चांक गाठत असून आतापर्यंत 33 लाखांचा टप्पा पार केला आहे.
भारतात मागील 24 तासात तब्बल 75 हजार 760 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 33 लाख 10 हजार 235 वर पोहचली असून, मृतांची संख्या 60 हजार 472 एवढी आहे.
सध्या देशात 7 लाख 25 हजार 991 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 25 लाख 23 हजार 722 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 3 कोटी 85 लाख 76 हजार 510 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 9 लाख 24 हजार 998 रुग्णांची तपासणी गुरुवारी एका दिवसात करण्यात आली.