कणकुंबी : खानापूर तालुक्मयातील माध्यमिक शाळांच्या समाज विज्ञान मराठी माध्यम विषय शिक्षकांची कार्यशाळा महात्मा गांधी विद्यालय नंदगड येथे पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन तालुका गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कार्यशाळेचे अध्यक्ष व बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील होते. प्रारंभी स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यशाळेचे नोडल अधिकारी व कारलगा हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. ए. पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांचा कार्यशाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. क्षेत्र संपन्मूल अधिकारी ए. आर. अंबगी, शिक्षण संयोजक क्रांती पाटील, शंकर कम्मार, वाय. व्ही. पाटील उपस्थित होते. समाज विज्ञान विषयाचे संपन्मूल व्यक्ती इंद्रजीत मोरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार गट तयार करून त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य पुरविले पाहिजे, शिक्षकांनी शंभर टक्के निकालाचे ध्येय समोर ठेवून कार्य केले पाहिजे, विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी एस. एस. कोलेकर, स्मिता कुदळे, सुजाता चलवेटकर, ए. वाय. पाटील व समाज विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते. जी. एस. धामणेकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष भाटे यांनी आभार मानले.
Previous Articleऔसा-तुळजापूर महामार्गावर चोरट्यांचा हैदोस
Next Article कुर्ली हालसिद्धनाथांच्या सेवेत नवीन सोन्या अश्व दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.