नंदिहळ्ळी गावाजवळ मिळाली जागा
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयाच्या वीजवितरणामध्ये सुरळीतपणा यावा, यासाठी नव्या स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे. तालुक्मयाच्या दक्षिण भागासाठी देसूर येथे 220 केव्ही स्टेशन उभारण्यात येणार आहे. या स्टेशनसाठी देसूर, नंदिहळ्ळी, सुळगा, राजहंसगड, यरमाळ या भागात जागेचा शोध मागील दीड वर्षांपासून सुरू होता. अखेर जागा निश्चित करण्यात आली असून नंदिहळ्ळी गावानजीक एक प्रशस्त असे विद्युत स्टेशन उभारले जाणार आहे.
तालुक्मयाच्या दक्षिण भागात 220 केव्ही विद्युत केंद्र सुरू व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. यरमाळ येथे जागानिश्चिती करण्यात आली होती. परंतु त्याला अंतिम मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे इतरत्र जागेचा शोध सुरू होता. सरकारी अथवा परवडेल अशा दरातील खासगी जागेचा शोध सुरू होता. अखेर नंदिहळ्ळी गावानजीक जागा उपलब्ध झाली आहे. या स्टेशनमुळे तालुक्मयाला दोन 220 केव्ही स्टेशन मिळणार असून एका स्टेशनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱया स्टेशनमधून वीजपुरवठा करता येणार आहे.
तालुक्मयाच्या वीजवितरणामध्ये होणार सुधारणा
बेळगाव शहर व तालुक्मयासाठी सध्या हिंडाल्कोजवळ एकच 220 केव्ही स्टेशन आहे. त्या केंद्रामध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण शहर व तालुका अंधारात जातो. यासाठी तालुक्मयाच्या उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागातही स्टेशन सुरू केल्यास तालुक्मयाला वीजवितरण करणे सोयीचे ठरणार आहे. एकाच स्टेशनवरचा भार कमी होवून दोन स्टेशनवर विभागला जाणार असल्याने बिघाड होण्याचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे.
15 एकर जागेचा प्रस्ताव
या स्टेशनसाठी 15 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. याचा प्रस्ताव बेंगळूर येथे पाठविण्यात आला आहे. जागेच्या दराची निश्चिती बेंगळूर येथे झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. केपीटीसीएलकडून निविदा काढून त्यानंतर काम सुरू केले जाणार आहे. यासाठी अजून 3 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
काही दिवसात कामाला होणार प्रारंभ
देसूर परिसरात 220 केव्ही स्टेशन उभारण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून जागेचा शोध घेण्यात येत होता. परंतु शासकीय दराप्रमाणे या परिसरात जमीन उपलब्ध होत नव्हती. सध्या नंदिहळ्ळी गावानजीक जागा उपलब्ध झाली असून येत्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असे प्रविणकुमार चिकाडे (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम ग्रामीण) यांनी सांगितले.