कोविड- 19 रोगसाथीच्या आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग हे स्तिमित झालेले असताना अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतफत्वाखालील जिसिम्सने मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीसाठी एक वेगळा मार्ग धुंडाळला आणि आपल्या वेब सिरीजचे गोवा येथे चित्रीकरण पूर्ण केले. नक्षलबारी या बहुप्रतीक्षित आणि लवकरच येऊ घातलेल्या वेब सिरीजची निर्मितीमागील कथाही अनोखी आहे. निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आता कशाप्रकारे हिंदी वेब सिरीजच्या क्षेत्रात उडी घेत आहेत त्याचीसुद्धा ही एक आगळी कहाणी आहे.
निर्मात्यांनी या वेब सिरीजचा एक टीझर नुकताच प्रकाशित केला त्यावरुन या वेब सिरीजच्या कथेची आणि एकूण हाताळणीचा अंदाज प्रेक्षकांना येतो. नक्षलबारी ही जंगलात राहणाऱया लोकांची त्यांच्या हक्कांसाठीची एक चळवळ असून व्यवस्थेविरुद्ध उभारला गेलेला तो एक लढा आहे. नक्षलबारी ही जीसिम्सची पहिली वेबसिरीज असून लवकरच ती झी5वर प्रदर्शित होणार आहे.
नक्षलबारीचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक पार्थ मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल मुख्य भूमिकेत आहे. त्याशिवाय टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पार्थो मित्रा हे भारतातील एक आघाडीचे दिग्दर्शक असून त्यांनी हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल क्षेत्रामध्ये गाजलेल्या मालिका व चित्रपट दिले आहेत. बडे अच्छे लगते है, कसम से आणि इतना करो ना मुझे प्यार या लोकप्रिय भारतीय सोप ऑपेरांचे दिग्दर्शन या प्रतिभावान दिग्दर्शकाने केले आहे. कोई आप सा हा हिंदी चित्रपट आणि हम ही वेबसिरीजसुद्धा त्यांनी दिग्दर्शित केली होती. जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार म्हणतात, आम्ही मनोरंजन क्षेत्रात ज्या ज्या विभागामध्ये निर्मिती केली ती दर्जेदार असेल यावर आमचा कटाक्ष राहिला आहे. कोविड -19 या साथरोग प्रसाराच्या सुरुवातीलाच आमची समांतर ही वेबसिरीज सुरु होती आणि प्रेक्षकांकडून तिला भरघोस प्रतिसाद लाभला. या मालिकेचा दुसरा भाग समांतर -भाग 2चे दिग्दर्शन प्रख्यात मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केले असून ही मालिका लवकरच प्रदर्शित होत आहे. लवकरच आम्ही जीसिम्सतर्पे एकदम वेगळय़ा विषयाला हात घालत असून त्यातून बळी – व्हिक्टीम या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. त्याचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत असून त्यात आघाडीचा मराठी अभिनेता स्वप्निल जोशी प्रमुख भूमिकेत आहे.