प्रांताधिकाऱयांकडे ठेवीदारांची धाव
प्रतिनिधी /बेळगाव
नदाफ पिंजार पेडिट सौहार्द सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ठेवी ठेवल्या आहेत. याचबरोबर या सोसायटीचे शेअर्सदेखील खरेदी केले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही सोसायटी बंद असून आमची ठेव परत द्यावी, या मागणीसाठी ठेवीदार आणि शेअर्सधारकांनी उपविभागाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले.
नदाफ पिंजार पेडिट सोसायटीमध्ये मोठय़ा प्रमाणात ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. त्या ठेवींची मुदत संपली आहे. ग्राहक सोसायटीत गेले असता त्यांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तुमच्या विरोधात कारवाई करू किंवा न्यायालयात जावू, असे सांगताच खुशाल जावा, असे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे चेअरमनसह संचालक मंडळाने ही रक्कम हडप केल्याचा आरोपदेखील या निवेदनात करण्यात आला आहे.
आम्हाला आमच्या ठेवी परत मिळवून द्या, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ठेवीदार आणि शेअर्सधारक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.