निफ्टी 55.95 अंकांनी घसरला – महिंद्रा ऍण्ड महिंद्रा नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात तिसऱया सत्रात बुधवारी बीएसई सेन्सेक्समध्ये नफा वसुलीच्या प्रभावामुळे घसरणीचे वातावरण राहिले होते. जागतिक बाजारात मजबूत स्थिती राहिल्याने इन्फोसिस, एचडीएफसी आणि टीसीएस यांचे समभाग नुकसानीत राहिले होते. समभागांच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचण्याच्या दरम्यान नफावसुली वेगात राहिल्याचे दिसून आले.
बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 214.18 अंकांनी घसरुन निर्देशांक 57,338.21 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.95 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,076.25 वर बंद झाला आहे. याचदरम्यान निफ्टीने 17,225.75 अंकांची झेप घेतली होते. दिवसभरामध्ये प्रमुख कंपन्यांपैकी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीचे समभाग हे सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले. यासोबतच टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, एचडीएफसी आणि इन्फोसिस यांचे समभाग घसरणीत राहिले. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया, ऍक्सिस बँक आणि टायटन यांचे समभाग तेजीत राहिले होते.
मंगळवारी बाजार बंद होताना देशातील अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 20.1 टक्क्यांची विक्रमी वृद्धी प्राप्त केल्याचे स्पष्ट झाले होते. मागच्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत ही कामगिरी निश्चितच सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले आहे. याचाही प्रभाव भारतीय बाजारात राहिल्याचे दिसले आहे. चालू महिन्यात आता नवीन ध्येय धोरणाचा प्रभाव कोणत्या स्थितीत बाजारावर राहणार आहे, त्यावर त्याची दिशा निश्चित होणार असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. आशियातील अन्य बाजारापैकी शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि सियोल हे लाभात राहिले आहेत. जीडीपी संदर्भातील आकडे मजबूत राहिल्याच्या अहवालानंतर भारतीय भांडवली बाजाराने तेजीसोबत सुरुवात केल्याचे दिसून आले.