येळ्ळूर / प्रतिनिधी
नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलीत नवहिंद महिला प्रबोधन संघाच्या वतीने शांताई वृद्धाश्रम बामणवाडी येथील निराधार महिलांना व पुरूषांना साडी व टॉवेलचे वितरण करण्यात आले.
नवहिंदच्या महिलांनी शांताई वृद्धाश्रमला सदिच्छा भेट दिली. एका आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शांताई वृद्धाश्रमचे कार्याध्यक्ष व माजी महापौर विजय मोरे हे होते. यावेळी नवहिंद महिला प्रभोधन संघाच्या अध्यक्षा शुभांगी पाटील यांनी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सुभाष धुमे गडहिंग्लज लिखित वाटसखे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपिठावर साहित्यिक सुभाष धुमे, नवहिंद प्रबोधिनीच्या सचिव संध्या हुंदरे, प्रियदर्शनी नवहिंद महिला पथसंस्थेच्या चेअरमन वैशाली मजुकर, क्हा. चेअरमन नम्रता पाटील, मरिया मोरे उपस्थित होते. कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी शांताईबद्धल संपूर्ण माहिती महिलांना सांगितली. सुभाष धुमे यांनी विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष शारदा मुरकुटे, सुनिता कणबरकर, सुलभा पाटील, सुरेखा सायनेकर, जयश्री देसूरकर, निता जाधव, शालन कुगजी, नयन उघाडे, शितल बस्तवाडकर, लता जाधव, पुजा कंग्राळकर, माधुरी पाटील, हिरा कुंडेकर, राजश्री दणकारे, स्वाती पाटील, संध्या अष्टेकर, वंदना कदम, किर्ती टोंबरे, प्रगती पाटील, सुधा माने, पल्लवी जाधव, सिंपल कुगजी, उज्वला मानकोजी आदी उपस्थित होते.