ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या मरियम शरीफ यांचे पती सफदर अवान यांना कराचीत हॉटेलचा दरवाजा तोडून अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्चात यांचा सहभाग होता.
आवन आणि मरियम शरीफ यांनी देशातील अत्याचार, भ्रष्टाचार, आर्थिक मंदी आदी मुद्द्यांवर इम्रान खान सरकारला लक्ष्य करत आंदोलन छेडले होते. या आंदोलनात पीडीएम आघाडीतील पीएमएल-एन, पीपीपी, जेयूआय-एफ समवेत 11 विरोधी पक्ष सहभागी झाले होते.
रविवारी लाखांच्या घरात जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनानंतरमरियम कराचीतील हॉटेलच्या रूमवर परतली. थोड्याच वेळात तिथे कराची पोलीस हजर झाले. पोलिसांनी मरियम यांचे तिचे पती सफदर आवन यांना हॉटेलचा दरवाजा तोडून अटक केली.