वेंगुर्ले (वार्ताहर)-
प्रा. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ दापोली व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र यांनी खास टेक्नीकने बनविलेल्या रसवंती मशिनचा शुभारंभ आज बुधवारी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते झाला.
यावेळी प्रा. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ दापोलीचे संशोधन संचालक डाँ.पराग हळदणकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालकर डॉ. बी. एन. सावंत, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेच्या माजी संशोधन संचालक सौ. इंदू सावंत, कृष संशोधन केंद्र फोंडाघाटचे कृषि विद्यानवेत्ता व्ही. एन. शेटये, वेंगुर्लेतील आंबा विभागातील उद्यानवेत्ता एम. एस. गवाणकर, अधिक्षक सुनिल नाईक, विषय विशेष तज्ञ डॉ. एन. बी. दळवी, काजू विभागातील उद्यानवेत्ता आरती गजभिये, वरीष्ठा संशोधन सहाय्यक पी. एम. तल्ला, चार प्रयोग शाळा मधील उद्यानवेत्ता डॉ. एम. बी. कदम, प्रगतशील बागायतदार व शेतकरी सदाशिव आळवे यासह प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.