मुंबई
फॉर्च्यूनरची नवीन आवृत्ती टोयोटा कंपनी नव्या वर्षामध्ये बाजारात दाखल करणार आहे. 6 जानेवारी रोजी नव्या फॉर्च्यूनर गाडीचे लाँचिंग होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या गाडीच्या चाचणीबाबतचा व्हिडीयो अनेकांनी सोशल मीडियावर पाहिला आहे. यावरून नवी फॉर्च्यूनर गाडी येण्याचे संकेत अनेकांनी व्यक्त केले होते. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये नव्या फॉर्च्यूनर गाडीचे लाँचिंग या आधीच करण्यात आले आहे. भारतामध्ये या गाडीचे लाँचिंग पुढच्या महिन्यात होणार आहे. बाहेरून या गाडीचा लुक स्पोर्टी असणार असून या गाडीत स्लिक लुकिंग एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पची सोय आहे.