5 जी सेवेबाबत उत्सुकता : सुमारे 200 दशलक्षपर्यंत पोहचणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
5 जी सेवेची वाढती उत्सुकता लक्षात घेता भारतामध्ये नव्या वर्षात स्मार्टफोनच्या मागणीमध्ये मोठी वाढ दिसणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. ही मागणी लक्षात घेऊनच भारतात होणाऱया स्मार्टफोन्सच्या शिपमेंटमध्ये यंदा वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या अनुषंगाने पाहता भारतामध्ये 2022 मध्ये स्मार्टफोनची शिपमेंट सुमारे 200 दशलक्षवर पोहचणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लोकांना घरी बसून काम करणे अगत्याचे असणार आहे. त्यामुळे येणाऱया काही महिन्यात स्मार्टफोनच्या मागणीमध्ये वाढही होऊ शकते. 5जी सेवा प्रत्यक्षात आल्यानंतर अधिकाधिक जण 5 जी सेवेचा लाभ देणारे स्मार्टफोन्स खरेदी करतील.
स्मार्टफोन बाजारपेठेचा विस्तार
गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात स्मार्टफोनची बाजारपेठ हळूहळू का होईना विकासाच्या मार्गावर आहे. 2019 मध्ये 158 दशलक्षची मागणी झाली होती. 2022 मध्ये 200 दशलक्ष इतकी शिपमेंट होऊ शकते असेही सांगितले जात आहे. 2019 च्या तुलनेमध्ये शिपमेंटमध्ये जवळपास 129 टक्क्मयांची वाढ राहणार असल्याचा अंदाज सांगितला जात आहे. दुसरीकडे रियलमीनेही 5 जी सेवेसंदर्भात पावले उचलली असून या सेवेअंतर्गत 15 हजार रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध करण्याचाही निर्णय रियलमीने घेतला आहे.
सेमीकंडक्टर पुरवठा सुधारणार
जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरचा पुरवठा आता हळूहळू सुधारत असून याचा लाभही स्मार्टफोन उद्योगाला उत्पादन वाढवण्यासाठी होणार आहे. 2021 च्या तिसऱया तिमाही अखेर शिपमेंटमध्ये 10 ते 15 टक्के वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2022 मध्ये सेमी कंडक्टरचा पुरवठा काही प्रमाणात सुधारत जाणार आहे.