योगदंड मिरवणुकीने श्री सिध्दरामेश्वरांचे पूजन
प्रतिनिधी / सोलापूर
पाच दिवस चालणारी श्री सिध्दरामेश्वरांच्या महायात्रेत शोभेचे दारुकाम हे देखील भाविकांचे मुख्य आकर्षण असत. मागील साधारण 150 वर्षांपासून चालत आलेल्या या पंरपरेत यंदा दुसर्यांदा खंड पडले आहे. यापूर्वी सोलापूरचे चार हुतात्म्यांना फाशी झाल्याची वार्ता समजताच त्या वर्षी शोभेचे दारुकाम करण्यात आले नव्हते. त्यानंतर तब्बल 90 वर्षांनी यंदा कोरोनामुळे ही परंपरा दुसर्यांदा खंडित झाली आहे. मात्र योगदंड मिरवणुकीने श्री सिध्दरामेश्वरांचे गदगी पूजन ही धार्मिक विधी करण्यात आली.
श्री सिध्दरामेश्वर यात्रेवर कोरोनाचे सावट कायम राहिले. मंगळवारी 12 जानेवारी 68 लिंग तैलाभिषेकाने पाच दिवसीय यात्रेच्या मुख्य धार्मिक विधी प्रारंभ झाले. बुधवारी अक्षता सोहळा तर गुरुवारी होमहवन, भाकणूक, करमुटगी स्नान आदी कार्यक्रम झाले आणि आज शुक्रवारी केवळ योगदंड मिरवणुकीने श्री सिध्दरामेश्वरांचे गदगी पूजन करण्यात आले. दरवर्षी आजच्या तिथीला मनोरंजनात्मक आणि समाजप्रबोधनपर शोभेचे दारुकाम करण्यात येत असत. भाविकांचा हा आकर्षणाचा एक उत्सव होता यंदा कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली. या उपक्रमाला साधारण 150 वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर चार हुतात्म्यांचा फाशी देण्यात आली, त्या वर्षी आणि त्यानंतर आता 90 वर्षांनी असे दोन वेळा शोभेचे दारुकाम विधी खंडित झाल्याचे मंदिर समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी सिध्दाराम पाच्छापुरे यांनी सांगितले.
केवळ धार्मिक विधी, शोभेचे दारुकाम खंडित.
साधारण 150 ते 175 वर्षांपूर्वी योगदंड मिरवणुकीने यात्रा केली जात असत. त्यानंतरच्या काळापासून विजयाचे प्रतिक म्हणून नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ झाले. तेव्हापासून शोभेचे दारुकामसह अखंड पाच दिवस यात्रा अविरतपणे चालू आहे. दरम्यान सोलापूरचे चारही हुतात्म्यांना फाशी शिक्षा झाल्याची वार्ता समजताच नंदीध्वज मिरवणूक थांबविण्यात आली. त्यावेळी शोभेचे दारूकाम करण्यात आले नव्हते. या 150 वर्षाच्या परंपरेत दोन वेळा यात्रा संक्षिप्त स्वरुपात करण्यात आली होती. – राजशेखर हिरेहब्बू, मानकरी.