पाच वर्षात 20 हजार नवीन मतदार
विनोद सावंत/कोल्हापूर
गेल्या पाच वर्षात महापालिका क्षेत्रात सुमारे 20 हजार नवमतदार झाले आहेत. याचबरोबर जानेवारी 2022 पर्यंत 18 वर्ष पूर्ण होणाऱयांची मतदार नोंदणीही महापालिकेच्या निवडणूकीसाठी पात्र ठरणार आहेत. हे नव मतदार महापालिकेच्या निवडणूकीत निर्णयक ठरणार आहेत. इच्छुकांचे नवमतदार टार्गेट असणार आहे.
शहरात कोरोनाची दुसरी साथ नियंत्रणात आली आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मतदार याद्यांचा ा†वशेष सां†क्ष‰ पुना†रक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये नव मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2022 मध्ये ज्यांचे 18 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यांचीही नोंदणी केली जाणार असून महापालिकेच्या निवडणूकीमध्ये त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने एक प्रकारे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूकीचे संकेत दिले आहेत.
हक्काच्या मतदारासाठी फिल्डींग
महापालिकेची 2015 ची निवडणूक एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होती. आता त्रिसदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी होण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच फिल्डींग लावणे सुरू केले आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची यादी तयार करून त्यांची नोंदणी होण्यासाठीही इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे.
नव मतदारांमध्ये प्रतिमा उंचवण्यासाठी सोशलमिडीयाचा वापर
प्रत्येक निवडणूकीत नव मतदाराचा मतदानाचा टक्का सर्वाधिक असतो. त्यामुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीत नक्कीचे ते टर्निंग पाईंट ठरणार आहेत. त्यामुळे इच्छुकांचे आतापासून नव मतदार ‘टार्गेट’ आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर आपली प्रतिमा उंचवण्यासाठी काही इच्छुकांनी स्वतंत्र टिमही नेमली आहे.
20 हजार मतदारांचा कौल कोणाला?
महापालिकेची 2015 मधील निवडणूकीमध्ये 81 प्रभाग होते. सुमारे साडेतीन हजार ते साडेसात हजाराचा एक प्रभाग होता. 2015 पासून 2021 पर्यंत महापालिका क्षेत्रात सुमारे 20 हजार नव मतदार झाले असून ते प्रथमच महापालिकेच्या निवडणूकीत मतदान करणार आहेत. त्यांचा कौल या निवडणूकीत कोणाला असणार तसेच त्यांचे पारडे कोणाच्या बाजून झुकणार यावरच निकाल आवलंबून असणार आहे.
नव मतदारांमुळेच प्रभाग रचनेत बदल
राज्य निवडणूक आयोग जानेवारी 2022 पर्यंतची मतदार यादी महापालिकेच्या निवडणूकीसाठी ग्राहय़ धरणार आहे. 2015 च्या निवडणूकीच्या तुलनेत नक्कीच 2022 च्या निवडणूकीत मतदारांची संख्या वाढणार आहे. जुन्या तीन प्रभागाचा मिळून एक वाŸर्ड होणार आहे. येथील वाढलेल्या मतदारांमुळे प्रभाग रचनेत बदल होणार असल्यानेच 81 वरून 90 सदस्य होणार आहेत.
तारीख प्रक्रिया नव मतदार नोंदणी प्रक्रिया
9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दुबार/ समान नेंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, नावातील त्रुटी दूर करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करणे.
1 नोव्हेंबर प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी, मतदार नोंदणीला सुरुवात
30 नोव्हेंबर हरकती
20 डिसेंबर दावे व हरकती निकालात काढणे
5 जानेवारी 2022 अंतिम मतदार यादी