खासदार अंगडी यांच्याकडे नागरीकांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असणाऱया नागपूर शहरातीला बेळगावमधून अनेक प्रवासी ये-जा करीत असतात. थेट रेल्वे अथवा विमान नसल्याने त्यांना इतर शहरांमधून नागपूर गाठावे लागत आहे. त्यामुळे बेळगावमधून विमानसेवा व आठवडय़ातून एकदा रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी नागरीकांनी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव शहरातील उत्तर भारतात अनेक रेल्वे कनेक्टिवीटी असली तरी पूर्वेकडे जाण्यासाठी व्यवस्था नाही. पुणे तसेच इतर शहरांमधून पूर्वेकडील राज्यांना जाता येते. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराला जाण्यासाठी बेळगावमधून थेट कोणतीही सुविधा नाही. मध्यंतरी स्टार एअरने बेळगाव-नागपूर या विमानसेवेसाठी तयारी सुरू केली होती. परंतु त्यानंतर कोरोनाची पहिली लाट आल्यामुळे नागपूर शहरातीला विमानफेरी सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर अद्याप ही विमानफेरी सुरू झालेली नाही.
साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची मागणी
नैऋत्य रेल्वेने हुबळी- नागपूर या मार्गावर रेल्वे सुरू केल्यास त्याचा फायदा बेळगाव, हुबळी, मिरज व परिसरातील प्रवाशांना होणार आहे. साप्ताहिक रेल्वे सुरू केल्यास नैऋत्य रेल्वेलाही महसूल मिळणार आहे. त्यामुळे खासदारांनी या रेल्वे व विमानसेवेसाठी पुढकार घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.