ऑनलाइन टीम तरुण भारत
दिग्दर्शक नागराज मंजुळे हे वेगळे विषय आणि उत्कृष्ट मांडणी असलेले चित्रपट घेऊन येत असतात.‘सैराट’, ‘फँड्री’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी दिले आहेत. आत्ता त्यांच्या आणखी एका चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे . या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची धमाकेदार एण्ट्री पाहायला मिळते. तसेच ते फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचे म्हटले जात आहे.हा चित्रपट येत्या ४ मार्च ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे.