अक्किनेनी नागार्जुन यांचा चित्रपट ‘द घोस्ट’मध्ये आता जॅकलीन फर्नांडिसच्या जागी अभिनेत्री सोनल चौहानची वर्णी लागली आहे. पूर्वी या चित्रपटात जॅकलीन नागार्जुनसोबत मुख्य भूमिका साकारणार होती. परंतु आता जन्नत फेम सोनल चौहानला हा चित्रपट मिळाला आहे.
चित्रपटात नागार्जुनची नायिका म्हणून सोनल चौहान अत्यंत उत्तम पर्याय ठरणार असल्याचे निर्मात्यांचे मानणे आहे. सोनल आणि नागार्जुन ही जोडी नवी असणार आहे. सोनल ही सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असून तिची फॅन फॉलोइंग देखील मोठी आहे.
चित्रपट द घोस्टकरता पूर्वी काजल अग्रवालची निवड करण्यात आली होती. परंतु गरोदरपणामुळे काजलने या चित्रपटातून अंग काढून घेतले आहे. त्यानंतर निर्मार्त्यांनी जॅकलीनचे नाव निश्चित केले होते. परंतु जॅकलीन अलिकडच्या काळात वादग्रस्त ठरल्याने निर्मात्यांनी सोनल चौहानचे नाव निश्चित केले आहे.