त्वरीत कापण्यात यावीः ग्रामस्थाची मागणी
लाटंबासै : म्हापसा ते दोडामार्ग मुख्य रस्ता मार्गावरील नानोडा या ठीकाणीकडील दुतर्फा वाढलेली झुडपे अपघातास आमंत्रण देवू लागली आहे त्वरीत दखल घेवून ती कापण्यात यावी अशी मागणी ग्रामस्था?नी केली आहे. वाढलेल्या झुडपामुळे कैक वेळा समोरून येणाऱया वाहनाचा अंदाज येत नसल्याने मोठे अपघात होवू शकतात. बामणवाडा, पिस्तेवाडा या वळणावर तर कोणताच अंदाज येत नसून पावसात बहरलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरू लागली आहे. अशाच वाढलेल्या झुडपामुळे नुकताच लाडफे वळणावर या मार्गावर पिळगांव येथील महिलेचा अपघात घडला होता. लाडफे या ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात दुतर्फा झुडपे वाढलेली असून ती कापण्यात यावी अशी मागणी ग्रामस्था?नी केली आहे. नानोडा प्राथमिक शाळेसमोर घालण्यात आलेले गतिरोधकावरील पांढरे पट्टे तसेच वेग मयादा फलक कित्येक महिन्यांपासून गायब झाल्याने गतिरोधकाचा अंदाज न आल्याने कित्येक वेळा अपघात घडून मोठी इजा झालेली आहे काही वेळा वाहनासकट वाहनधारक आदळून पडलेले आहे. गायब झालेले वेग मर्यादा फलक, गतिरोधकावरील पट्टे घालावेत तसेच दुतर्फा वाढलेली झुडपे कापावीत अशी मागणी वाहनधारकांबरोबर ग्रामस्था?नी केली आहे.