प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहेत. समाजातील गोरगरीब आणि गरजूंना या साहित्याचे वाटप सुरू आहे. श्री नामदेव शिंपी समाज वडगाव-खासबागवतीने शनिवारी समाजातील गोरगरीब समाजबांधवांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
बाजार गल्ली वडगाव येथील श्री अंबाबाई देवस्थानाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी नियमांचे पालन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत हाशिलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत महिंद्रकर, सहसचिव मोहन कोपर्डे, सभासद सतीश खटावकर, एम. के. भस्मे, संतोष गोंदकर, आदींसह नामदेव युवक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.