ऑनलाईन टीम / मुंबई :
आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी सीबीडी येथील सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून सिडको कार्यालयापासून 100 मीटर परिसरात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात केला.
यावेळी स्थानिक भूमिपुत्रांकडून सिडको प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, येत्या 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव मिळाले नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचे काम बंद पाडू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे नवी मुंबई शहरातील बंद करण्यात आलेली वाहतूक आता सुरू करण्यात आली आहे. सर्व मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली असून नवी मुंबई वाहतूक पोलीसांकडून वाहतूक सुरू केल्याची घोषणा करण्यात आली आहे.