शिरोळ / प्रतिनिधी
विधान परिषद महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांची कारखान्याच्या कार्यस्थळावर भेट घेतली. तसेच सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. यावेळी सतेज पाटील यांनी शिरोळ शहरातील विविध नेत्यांची भेटी घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रविवार दि 14 रोजी सकाळी 11 वाजता श्रीदत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर महाविकास आघाडीचे विधान परिषद उमेदवार सतेज पाटील यांनी गणपतराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक यांना महाविकास आघाडीचे मतदाराबरोबरच अन्य पक्षांच्या ही मतदारांशी संपर्क साधून जास्तीत जास्त मतदान आपल्याला मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी काँग्रेसचे सर्जेराव शिंदे गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख वैभव उगळे पंचायत समिती सदस्यया अर्चना चौगुले मिनाज जमादार नगरसेवक योगेश पुजारी विठ्ठल पाटील मुसा डांगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.