प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हा शासकीय रुग्णालयात निकष डावलून एका वैद्यकीय अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सोशल मिडायवर आहे. अधिकारी नियुक्तीसाठी एमबीबीएस ही पात्रता आवश्यक असताना त्या जागी एलपीसीएस डिप्लोमा होल्डरची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याला महत्त्वाच्या वॉर्डची जबाबदारी देण्यात आल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो असा आरोप वैद्यकीय वर्तुळातून होत असल्याचे वृत्त आहे. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय नेहमीच वेगवेगळय़ा कारणांनी चर्चेत असते. यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱयांच्या रिक्त पदावरून आणि पावसाळ्यामध्ये नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून चर्चा रंगली होती. सोमवारी पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी अनेक आक्षेपार्ह गोष्टीsबद्दल सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱयांना त्यांनी सुनावले. वैद्यकीय बिले मंजूर न करणे, कर्मचारी, डॉक्टरांशी उद्दामपणे बोलणे अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.
आता एका वैद्यकीय अधिकाऱयांच्या नियुक्तीवरून सिव्हील रूग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयात एमबीबीएस डिग्री होल्डर या पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. मात्र एमबीबीएसऐवजी एलपीसीएस डिप्लोमा धारण करणाऱया व्यक्तीची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जाहिरात जर एमबीबीएससाठी आहे तर एलपीसीएस डिप्लोमा होल्डरची नियुक्ती कशी होते, नियुक्ती झाल्यानंतर त्या अधिकाऱयाकडे महत्वाची वॉर्डची जबाबदारी कशी दिली जाते, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.