प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील भिरोंडा पंचायतीच्या उपसरपंचपदी निकिता नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे .सरपंचा तेरेझा आंद्राद यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा देऊन त्यांची सरपंचपदी नियुक्ती झाल्यानंतर उपसरपंच पदाच्या स्थान रिक्त झाले होते. नवीन उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी खास बोलावण्यात आलेल्या बैठकीला सर्व पंच सभासद उपस्थित होते. या पदाला निकिता नार्वेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे छाननी प्रक्रियेनंतर त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी प्रतापराव राणे यांनी केली. निकिता नार्वेकर यांच्या उमेदवारी अर्जाची शिफारस उदयसिंग राणे यांनी केले तर त्याला तेरेझा आंद्राद यांनी अनुमोदन दिले. यावेळी पंच सभासद नितीन शिवडेकर,समील बागी, सदा गावकर पल्लवी गावकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना निकिता नार्वेकर यांनी सांगितले की येणाऱया काळात उपसरपंचपदाच्या खुर्चीवर पंचायतीच्या सर्वांगीण विकासाला संपूर्णपणे चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे.यासाठी सर्व सभासदांचे सहकार्याची अपेक्षा केली.