आतापर्यंत 2 हजारांवर नागरिकांना लस : महात्मा गांधी रुग्णालयात व्यवस्था : लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / निपाणी
गेल्या महिन्याभरापासून निपाणीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही लसीकरण मोहीम सुरू असून याचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाचा बिमोड करण्यासाठी व्यापक स्वरूपात देशपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा म्हणून काम करत असणारे आरोग्य, महसूल, पोलीस आदी कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात आले. यानंतर लोकप्रतिनिधींनीही लस टोचून घेत नागरिकांना लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत लसीकरण मोहीम सुरू आहे. दररोज 70 ते 80 जणांना दिली जात आहे. येथे येणाऱया 60 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील नागरिकांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्यास संबंधित डॉक्टरांचे पत्र घेऊनच लसीकरण केले जात आहे.
निपाणी तालुक्मयात आतापर्यंत लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. सध्या पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे सावध झालेल्या प्रशासनाकडून प्रशासकीय निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करण्यात येत आहे. मास्कसक्तीचीही अंमलबजावणी सुरू आहे.
तालुक्मयात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. येथील गांधी रुग्णालयात दररोज 25 ते 30 जणांची कोरोना चाचणी होत आहेत. आरटी-पीसीआर चाचणीबरोबरच प्रसूतीसाठी येणाऱया रुग्णांची आपत्कालीन म्हणून रॅपिड चाचणी केली जात आहे. मात्र आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल पाच ते सहा दिवसानंतर मिळत आहे.
आतापर्यंत फ्रन्टलाईन वर्कर म्हणून काम करणाऱया तीनशेहून अधिक जणांना तर आरोग्यसेवक म्हणून काम करणाऱया सुमारे पंधराशे जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. साठ वर्षांवरील 300 तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील सुमारे 30 हून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.