नवी दिल्ली
अस्थिरतेच्या वातावरणात खासगीकरण प्रक्रियेत अडथळे जाणवत असून केंद्राचे निर्गंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. आर्थिक वर्ष 2022 साठी सरकारने 1.75 ट्रीलियन रुपयांचे लक्ष ठेवले आहे. निर्गंतवणुकीचे नवे उद्दिष्ट कमी केले जाण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे खासगीकरण सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे.