172 अब्ज डॉलरच्या नुकसानीचे संकेत : संयुक्त राष्ट्र
नवी दिल्ली :
कोरोना विषाणूचा वाढता विळखा अर्थव्यवस्थेचे विविध घटकांना नुकसान निर्माण करीत आहेत. याचा परिणाम म्हणून आशिया आणि प्रशांत या विभागात येणाऱया देशांच्या निर्यात क्षेत्रात मोठी घसरण निर्माण होण्याचे संकेत आहेत. आणि याच कारणामुळे या क्षेत्राचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) प्रभावीत होत 0.8 टक्क्मयांनी म्हणजेच 172 अब्ज डॉलरची घसरण नोंदवली जाण्याची शक्मयता आहे. अशी माहिती युएनच्या आर्थिक ऍण्ड सोशल कमीशन फॉर अशिया ऍण्ड द पॅसिफिक (इएससीएपी) यांच्या अहवालातून देण्यात आली आहे.
निर्यात क्षेत्रात प्रामुख्याने व्यापारी करार अमेरिका आणि युरोपीय संघट यांच्याकडून आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील वस्तुंच्या मागणीत मोठी घसरण होण्याचा अंदाज आहे. कारण अमेरिकेसह युरोपमध्येही कोरोनाचे थैमान सुरु असून यामुळे दोन्ही खंड मोठय़ा संकटाचा सामना करत आहेत.
प्रभावीत देश
आशिया आणि प्रशांतमधील व्हिएतनाम, मंगोलिया, कंबोडिया आणि सिंगापूर या सारख्या देशांना निर्यातीमधून मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. तर आर्थिक ऍण्ड सोशल सर्वे ऑफ आशिया ऍण्ड द पॅसिफिक 2020 या अहवालानुसार फक्त निर्यात घटल्यास जवळपास 0.6 ते 0.8 टक्क्मयांनी (132 ते 172अब्ज डॉलर) घटण्याचे अनुमान आहे.
आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील विकसनशील देशांच्या आरोग्य विभागावर करण्यात येणार खर्च वर्षाला 88 कोटी डॉलरने वाढविण्याची गरज आहे. भविष्यात या परिस्थितीमधून सावरण्यासाठी या क्षेत्रात स्वतंत्र निधी उभारण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. तर यात आर्थिक नियमात शिथिलता कायम ठेऊन आर्थिक नियोजनाची घडी तयार करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले आहे.