प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाट येथे ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोघे जखमी झाल़े ही घटना रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडल़ी जखमींना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े
रामलाल बाबूलाल तिलवेसनी (22) व दिनेश हरिराम निवेसनी (32, ऱा दोघेही जोधपूर, राजस्थान) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत़ रामलाल व दिनेश हे दोघे आपल्या ताब्यातील ट्रक (आर जे 19 जीजी 5655) घेवून मुंबई-गोवा महामार्गाने जात होत़े निवळी घाट येथे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याकडेला उलटल़ा यामध्ये रामलाल व दिनेश यांना दुखापत झाल़ी घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े…