प्रतिनिधी/ बेळगाव
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त (डिसीपी) पी. व्ही. स्नेहा यांनी शनिवारी सूत्रे स्वीकारली. पोलीस दलातील आपल्या प्रदीर्घ सेवेतून शनिवारी निवृत्त झालेले चंद्रशेखर निलगार यांनी स्नेहा यांच्याकडे सूत्रे सोपविली.
बेळगावला बदली होण्यापूर्वी स्नेहा या म्हैसूर येथील लोकायुक्त विभागाच्या पोलीसप्रमुख म्हणून सेवा बजावत होत्या. शुक्रवारी सायंकाळी सरकारने बेळगावला त्यांची बदली केली होती. शनिवारी त्यांनी पदभार स्वीकारला. चंद्रशेखर निलगार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.