वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये मंगळवारी बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष प्राप्त झाले आहेत. अवशेषांनजीक 6 मृतदेहही हस्तगत झाले आहेत. लिखू पीके गाव आणि दुधकुंडा नगरच्या सीमेनजीक हे अवशेष मिळाले असून या भागाला लामाजुरा डांडा असेही म्हटले जाते. हेलिकॉप्टरचे अवशेष तेथे असल्याची माहिती स्थानिकांनी प्रशासनाला दिली होती. मेक्सिकोच नागरिक या हेलिकॉप्टरमधून माउंट एव्हरेस्टचे दर्शन घेणार होते.
या हेलिकॉप्टरचे उड्डाण सीनियर कॅप्टन छेट गुरुंग करत होते. या हेलिकॉप्टरमधून मेक्सिकोचे 5 नागरिक प्रवास करत होते. हेलिकॉप्टर कोसळताच त्यात स्फोट झाला होता असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी माउंट एव्हरेस्टनजीक हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटला होता. मनांग एअरच्या हेलिकॉप्टरने सुकरी येथून काठमांडूसाठी सकाळी 10.04 वाजता उड्डाण केले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उ•ाण केल्याच्या 10 मिनिटांनीच हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला होता. तसेच हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाले होते. हेलिकॉप्टर कशामुळे कोसळले याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचे नेपाळ नागरी उ•ाण प्राधिकरणाचे अधिकारी ग्यानेंद्र भुल यांनी म्हटले आहे. संपर्क तुटण्यापूर्वी हेलिकॉप्टर 12 हजार फुटांच्या उंचीवरून उ•ाण करत होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला स्वत:चा मार्ग बदलावा लागला होता.
यापूर्वी जानेवारी महिन्यात नेपाळमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 68 जणांना जीव गमवावा लागला होता. यति एअरलाइन्सचे विमान काठमांडूपासून 205 किलोमीटर अंतरावरील पोखरा येथे कोसळले होते. दुर्घटनेत 5 भारतीय प्रवाशांचाही मृत्यू झाला होता.