प्रतिनिधी/ रत्नागिरी
नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱया टोळीतील 6 संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केल़ा रत्नागिरी तालुक्यातील पानवल व शहरालगतच्या काजरघाटी येथे फसवणुकीच्या घटना समोर आल्या होत्य़ा याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली होत़ी संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होत़ा
न्यायालयाने 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केल़ा साईराज प्रमोद विलणकर (27), वैशाली बाळकृष्ण दरडे उर्फ नेहा आखाडे (38, दोघेही खडपे वठार, रत्नागिरी), साईराज सुनील मोरे (26, शिरगाव, रत्नागिरी), अनोफ अहमद झारी (कोकणनगर, रत्नागिरी), ओमकार हेळेकर उर्फ आशिष पाथरे (साडवली, देवरूख), ओमकार राजकुमार तोडणकर (पेठकिल्ला, रत्नागिरी) अशी जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत़ आरोपींच्यावतीने ऍड. उन्मेष मुळे, ऍड. प्रवीण सुर्वे, ऍड. आशिष घोसाळे, आदेश चवंडे, ऍड. वायकुळ, ऍड. मंगेश जाधव यांनी काम पाहिल़े
तालुक्यातील पानवल येथील शंकर लिंगायत यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. शंकर लिंगायत हे पानवल येथे पूजाऱयाचे काम करतात़ फेबुवारी 2019 मध्ये त्यांची ओळख साईप्रसाद विलणकर याच्याशी झाली होत़ी यावेळी साईप्रसाद याने आपण सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या मुलाला सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लावतो, असे आमिष दाखवल़े त्यासाठी लिंगायत यांच्याजवळ पैशाची मागणी केल़ी
मुलाला नोकरी लागेल या आशेने लिंगायत यांनी साईराजला पैसे देण्याची तयारी दर्शवल़ी यावेळी साईराज याने अन्य संशयितांना हाताशी धरून फेबुवारी 2019 ते फेबुवारी 2020 या काळात 1 लाख 15 हजार रूपये उकळल़े पैसे देवूनही मुलाला नोकरी लागत नसल्याने फसवणूक झाल्याचे लिंगायत याच्या लक्षात आल़े त्यांनी साईराज याच्याजवळ पैशासाठी तगादा लावल़ा मात्र साईराज याने पैसे देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केल़ी अशी तक्रार लिंगायत यांनी ग्रामीण पोलिसांत दाखल केली होत़ी