वाढत्या कोरोनामुळे न्यायालय आवारात केवळ वकिलांना प्रवेश
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या कामकाजावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आवारात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालय आणि जेएमएफसी न्यायालयाचे प्रवेशद्वारच बंद करण्यात आल्याने पक्षकारांना गेटसमोरच दिवसभर ताटकळत थांबावे लागले.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयांना महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज करण्यासाठी मुभा दिली आहे. वकिलांनी ऑनलाईनद्वारे यापुढे खटले दाखल करायचे आहेत. जे खटले महत्त्वाचे नाहीत, ते पुढे ढकलले गेले आहेत. वकिलांनाही न्यायालयात जाताना स्क्रिनिंग चाचणी करूनच पुढे जावे लागत आहे. तोंडाला मास्क तसेच सॅनिटायझरचाही वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
आता महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज होणार आहे. मात्र उर्वरित खटल्यांचे कामकाज प्रलंबित राहण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. पक्षकारांना प्रवेशद्वारासमोरच दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. उन्हामध्ये वकिलांची वाट पाहत थांबावे लागत असल्याने पक्षकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. दोन्ही प्रवेशद्वारांसमोर मंगळवारी मोठी गर्दी दिसून आली. याठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे पक्षकारांना वकिलांच्या गाठीभेटी घेणे कठीण झाले होते. उच्च न्यायालयाने अनेक निर्बंध घातले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी मुख्य जिल्हा सत्र न्यायालय काटेकोरपणे करू लागले आहे.
तालुक्मयांतील न्यायालयांमध्येही हे सर्व निर्बंध पाळले जात आहेत. तालुक्मयांमध्ये असलेल्या न्यायालयांच्या परिसरातदेखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने तालुक्मयांतील न्यायालयांना उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद केली आहे. त्यामुळे तालुक्मयांतील न्यायालयांमध्येही कामकाज ठप्प झाले आहे.
शनिवारी न्यायालयाला सुटी
शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार दि. 22 रोजी न्यायालयाला सुटी जारी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने या सुटीबाबतचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाला पाठवून दिले आहेत.