ऑनलाईन टीम / काबुल :
आजवर अजिंक्य असलेला पंजशीर प्रांत ताब्यात घेतल्याचा दावा काल तालिबानने केला. मात्र, मध्यरात्री अज्ञात लढाऊ विमानांनी पंजशीरमधील 5 तालिबानी चौक्यांवर एअर स्ट्राईक केला. यामध्ये अनेक तालिबानी दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त तेथील स्थानिक मीडियाने दिले आहे.
15 ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. मात्र, अजिंक्य असलेला पंजशीर प्रांत तालिबानला जिंकता आला नव्हता. सोमवारी पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरवर बॉम्बहल्ला करत हा प्रांत ताब्यात घेण्यास तालिबानला मदत केली होती. मात्र, आज अज्ञात विमानांनी पंजशीरमधील 5 तालिबानी चौक्यांना लक्ष्य करत बॉम्ब हल्ला केला.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप इराणला मान्य नाही. इराणने या प्रकाराबद्दल पाकिस्तानला सुनावले असून, इराण या प्रकरणाची चौकशी करत आहे.