ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 481 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 30 हजार 157 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 580 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण 1,30,157 रुग्णांपैकी 1 लाख 21 हजार 735 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 095 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 24 लाख 33 हजार 133 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 327 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 110 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 27 जण व्हेंटिलेटरवर आहेत.