- सरकारने दिली वितरणाची परवानगी
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाब सरकारने कोरोना रुग्णांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता जे रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. तरी देखील ज्या रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासेल अशा रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर घरी नेता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मात्र यासाठी संबंधित कोरोना रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबीयांना स्व घोषणा पत्र द्यावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्ण एक महिन्यासाठी कंसट्रेटर घरी नेऊ शकणार आहे. पंजाबचे आरोग्य मंत्री बलबिर सिंह सिद्धू यांनी जिल्हा प्रशासनाला कंसट्रेटर जारी करण्याचे अधिकार दिले आहेत. हा निर्णय अशा रुग्णांसाठी घेण्यात आला आहे, ज्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर काही दिवसांसाठी कमी काळासाठी ऑक्सिजनची गरज असते.
बलबिर सिंह सिद्धू म्हणाले, होम आयसोलेटमध्ये असणाऱ्या रुग्णांना याचा लाभ घेता येणार नाही. संक्रमित रुग्णाला डॉक्टर तथा रुग्णालयाच्या सल्ल्यानेच घरी ऑक्सिजन ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. अशा रुग्णांवर देखरेख करण्याची जबाबदारी उपचार करणाऱ्या डॉक्टरांची असणार आहे.
- जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची केली जाणार नियुक्ती
ऑक्सिजन बँकची देखरेख आणि कामकाजासाठी सर्व उपयुक्त प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहेत. हे अधिकारी प्रत्येक दिवशी संबधित उपयुक्त आणि पंजाब आरोग्य प्रणाली निगमला रिपोर्ट करतील.